
US Donald Trump Tariffs: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या व्यापार धोरणात बदल करणारे दोन मोठे निर्णय घेतले आहेत. या निर्णयाचा थेट परिणाम अमेरिकेबाहेर औषधांचे उत्पादन करणाऱ्या औषध कंपन्यांवर होईल.

Donald Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या व्यापार धोरणात बदल करणारे दोन मोठे निर्णय घेतले आहेत. पहिला, जर कंपन्यांनी औषधांच्या किमती कमी केल्या नाहीत आणि उत्पादन अमेरिकेत स्थलांतरित केले नाही, तर परदेशी बनावटीच्या औषधांवर 100% पर्यंत टॅरिफ (US Tariffs Impact) लादल्या जाऊ शकतात. तर दुसरा निर्णय असा आहे कि, स्टील आणि ॲल्युमिनियमसारख्या धातू उत्पादनांवरील कर नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US Donald Trump) यांनी व्यापार धोरणात मोठा बदल करत, परदेशी बनावटीच्या औषधांवर 100% पर्यंत मोठा कर (टॅरिफ) लावण्याचा आदेश दिला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम अमेरिकेबाहेर औषधांचे उत्पादन करणाऱ्या औषध कंपन्यांवर होईल.

Donald Trump Tariffs : अटींचे पूर्णपणे पालन न करणाऱ्या कंपन्यांना मोठा दंड
ट्रम्प यांनी हे स्पष्ट केले आहे की, कंपन्यांना केवळ त्यांच्या औषधांच्या किंमती कमी करणेच नव्हे, तर त्यांचे उत्पादन अमेरिकेतच करणे देखील बंधनकारक असेल. या अटींचे पूर्णपणे पालन न करणाऱ्या कंपन्यांना मोठा दंड आणि कर भरावा लागेल. असेही ट्रम्प यांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी स्टील, ॲल्युमिनियम आणि तांबे यांसारख्या धातू उत्पादनांच्या कर नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, अनेक वस्तूंवरील आयात शुल्काचे दर कमी केले आहेत आणि कर संकलन प्रक्रियेत बदल केला आहे.



