E-Paperलोकल न्यूज़

बापगावात भटक्या कुत्र्यांची दहशत! पाच जणांना घेतला चावा; प्रशासनाच्या कारवाईची प्रतीक्षा

कारवाईची मागणी

खबर 24 LIVE

बापगाव (विशेष प्रतिनिधी) : कल्याण – पडघा रोड वरील बापगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, कुत्र्यांनी पाच नागरिकांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती मिळत आहे.

परिसरातील रस्ते, गल्लीबोळ तसेच सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून, नागरिकांना घराबाहेर पडतानाही सावधगिरी बाळगावी लागत आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण आहे.

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायत व प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच परिसरात आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था व जनजागृती करावी, अशी मागणी केली आहे.

आता प्रशासन किती नागरिकांवर हल्ला होण्याची वाट पाहणार? असा संतप्त सवाल बापगाव परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कल्याण महापालिका परिसरातील भटके कुत्रे बापगाव परिसरात आणून सोडले जातात अशी चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!