E-Paperगोदावरीचा विकास

नंदिनी वाचवायची असल्यास, आंदोलनाशिवाय पर्याय नाही – अमित कुलकर्णी

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर गोदावरीची प्रमुख उपनदी नंदिनी नदीचे संरक्षण तसेच मा. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून नदीपात्रात सुरू असलेले ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम तात्काळ थांबविण्याच्या मागणीसाठी निसर्गसेवक युवा मंच, नंदिनीप्रेमी व पर्यावरणप्रेमी यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलन शनिवारी दिनांक 11 जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता, श्री म्हसोबा महाराज मंदिराजवळ, सिटी सेंटर मॉल, छत्रपती संभाजी महाराज चौक, नाशिक येथे शांततापूर्ण करण्यात येणार असून या आंदोलनात पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन निसर्गसेवक अमित कुलकर्णी, अनिकेत मंडाले, अमित कुशवाह, निलेश गायकवाड आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!