Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
लोकल न्यूज़

नगरसेविका साधना पवन मटाले यांच्या कडून तात्काळ दखल : सांडपाण्याच्या दुर्गधीने नागरिक होते त्रस्त

नगरसेविका साधना पवन मटाले यांच्या कडून तात्काळ दखल.

नवीन नाशिक प्रतिनिधी : येथील दुर्गानगर भागातील सायखेडकर हॉस्पिटल च्या मागील बाजूस ड्रेनेज चॉकप होऊन संपूर्ण सांडपाणी रस्तावर वाहत असल्याने संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधी मुळे नागरिक त्रस्त झाले होते. परिसरातील काही नागरिकांनी नगरसेविका साधना मटाले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या कडून तात्काळ समस्या निवारण होईल असे सांगण्यात आले. 

अगदी काही वेळात नगरसेविका साधना पवन मटाले यांनी त्याठिकाणी भेट देवून महापालिकेच्या संबंधीत कर्मचारी वर्गास घटनास्थळी बोलावून संपूर्ण प्रकरणाची विल्हेवाट लावली.

खबर 24 LIVE You Tube link :

ड्रेनेज चे सांडपाणी परिसरात अर्धा किलोमीटर पर्यंत पसरत जाऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. परंतु नगरसेविका साधना मटाले यांच्या तात्काळ नियोजना मुळे समस्या निवारण होण्यास मदत झाली. यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

नागरिकांची समस्या ही माझी सुद्धा समस्या असून त्याचे तात्काळ निवारण करणे माझे कर्तव्य आहे असे नगरसेविका साधना पवन मटाले यांनी खबर 24 LIVE शी बोलतांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!