अपघाती मृत्यू : भोंदू खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू
अपघात की घातपात? सोशल मीडियावर चर्चाना उधाण

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात भोंदू बाबा अशोक खरात याचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा तसेच त्यांच्या पत्नी या दोघांचा मृत्यू झाला आहे. ते संभाजी नगरहून शिर्डीला जात असताना समृध्दी महामार्गावरती त्यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती आहे.
कारची कंटेनरला पाठीमागून धडक
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना धोत्रे गावाजवळ शेळके यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक दिली असल्याची माहिती आहे. कार थेट कंटेनरखाली घुसली आहे. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात जिंतेद्र शेळकें व त्याच्या पत्नी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघात की घातपात?सोशल मीडियावर चर्चाना उधाण.




