Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paper

छत्रपती संभाजी महाराज जयंती : छावा क्रांतीवीर सेना करणार साजरी.

नाशिक : छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने उद्या छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार…

नाशिक : स्वराज्याच्या रक्षणासाठी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी रणांगणात उतरलेले आणि वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे, महापराक्रमी, संस्कृतपंडित व स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने उद्या बुधवार दि. १४ मे रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती संभाजी चौक,सिटी सेंटर मॉल,नाशिक येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.तसेच दुग्धाभिषेक, शिवचरित्र वाचन आणि त्यांच्या पराक्रमपूर्ण जीवनप्रवासाचे स्मरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शंभूभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिक जिल्हाप्रमुख आशिष हिरे यांनी केले आहे.
या सोहळ्याचे आयोजन आशिष हिरे,शिवाजी मोरे,शिवा तेलंग, नवनाथ शिंदे,डॉ.किरण डोखे, योगेश गांगुर्डे,सुभाष गायकर तसेच छावा क्रांतिवीर सेनेच्या सर्व आघाड्यांचे जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख,तालुकाप्रमुख व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील खासदार, आमदार,नगरसेवक तसेच विविध पक्षांचे जिल्हाप्रमुख व महानगरप्रमुख यांनाही निमंत्रित करण्यात आल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!