E-Paperगोदावरीचा विकास

“नासर्डी नाही… ती ‘नंदिनी आहे!” — नंदिनी नदी पुनरुज्जीवनासाठी प्रशासनाला कारवाईचे आदेश.

“नासर्डी नाही… ती ‘नंदिनी आहे!” — नंदिनी नदी पुनरुज्जीवनासाठी प्रशासनाला कारवाईचे आदेश.

नाशिक : नाशिक शहरातील नंदिनी नदी पुनरुज्जीवन, नदीपात्रातील गाळ काढणे, नैसर्गिक नाल्यांची सफाई तसेच “नासर्डी नदी” ऐवजी “नंदिनी नदी” हे नाव अधिकृत करण्याबाबत निसर्गसेवक युवा मंचचे अध्यक्ष अमित कुलकर्णी (नंदिनी दूत) यांनी मा. विभागीय आयुक्त तथा गोदावरी प्रदूषण नियंत्रण समिती अध्यक्ष यांच्याकडे केलेल्या मागणीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

मा. विभागीय आयुक्त श्री. प्रवीण गेडाम यांनी यासंदर्भात नाशिक जिल्हाधिकारी व नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. यामध्ये नदीपात्रातील गाळ काढणे, नैसर्गिक जलप्रवाह पुनर्संचयित करणे, नदीला जोडणाऱ्या नैसर्गिक नाल्यांची सफाई व अतिक्रमण हटविणे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.

तसेच “नासर्डी” ऐवजी “नंदिनी नदी” नाव अधिकृतरीत्या वापरण्याबाबतही मागणी करण्यात आली असून, NMC Environmental Status Report (ESR 2022) मध्ये संबंधित नदीचा उल्लेख “Nandini River” असा असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा, वाढते प्रदूषण आणि नाशिक शहरातील पर्यावरणीय स्थिती लक्षात घेता नंदिनी नदीचे पुनरुज्जीवन ही अत्यंत महत्त्वाची व तातडीची गरज असल्याचे अमित कुलकर्णी यांनी सांगितले.

“ही केवळ नदी नाही, तर नाशिकच्या पर्यावरणीय अस्तित्वाचा आणि भविष्यातील जलसुरक्षेचा प्रश्न आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

— अमित कुलकर्णी (नंदिनी दूत)
अध्यक्ष – निसर्गसेवक युवा मंच, नाशिक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!