Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paper

‘राजा शिवाजी’ साठी ‘बॉलिवूड मधील दिग्गज’ एकवटले

रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र आणून स्वाभिमानाने लढायला शिकवलं आणि त्यांचा हाच थरारक संघर्ष माझे मित्र आणि अभिनेते रितेश जी देशमुख यांनी #राजा_शिवाजी या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आणलाय. सहकुटुंब हा चित्रपट बघितला. #राजा_शिवाजी हे नावंच इतकं ताकदीचं आहे की, त्यासाठी पूर्ण बॉलिवूड एकत्र आलं आणि एक अद्भुत असा चित्रपट तयार झाला. अजय-अतुल या मराठमोळ्या जोडीने दिलेलं संगीत आणि अभिनेते रितेश देशमुख यांच्यासह संजय दत्त, अभिषेक बच्चन आदी सर्वांच्याच ताकदीच्या भुमिकांनी जणू महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गाथा रचली आणि दैदिप्यमान इतिहास पुन्हा एकदा जीवंत केला.. या चित्रपटातील अनेक प्रसंग पाहताना अंगावर अक्षरशः काटा येतो आणि ज्या संघर्षातून महाराजांनी स्वराज्य उभं केलं ते पाहून छाती अभिमानाने फुलून येते. महाराजांचं वैभव, खडतर संघर्ष, जबरदस्त युद्धदृश्य आणि भावनिक खोली असलेला हा चित्रपट पाहणाऱ्याचं अगदी मन जिंकतो. महापुरुषांनी केलेला संघर्ष आपण अनेक पुस्तकात वाचलाय पण या चित्रपटाच्या निमित्ताने महाराजांचा संघर्ष अनुभवायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच संघर्षशील इतिहासातून प्रेरणा घेऊन आज देशासाठी खऱ्या अर्थाने संघर्ष करण्याची आणि त्यासाठी दुसऱ्याच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची वाट न पाहता प्रत्येकानेच महाराजांच्या भूमिकेत उतरून संघर्ष करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. ही प्रेरणा तुम्हाला या चित्रपटातून नक्की मिळेल, त्यासाठी प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट आवर्जुन पहावा…! जय भवानी… जय शिवाजी..!

शब्दांकन : आमदार रोहित पवार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!