Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperलोकल न्यूज़

Swiggy आणि Burger King विरोधात सामान्य नागरिकाची तक्रार दाखल

'मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली" अशीच काहीशी स्विगी - बर्गर किंग ची परिस्थिती

नाशिक प्रतिनिधी : बर्गर तयार करून विकणारी कंपनी बर्गर किंग आणि तेच बर्गर घरपोच देणारी कंपनी स्विगीच्या विरोधात सामान्य नागरिक अमोल विसपुते यांनी तक्रार दाखल केली.

अमोल विसपुते यांनी आपल्या लहान मुलीला स्विगीच्या ऍप द्वारे बर्गर किंग येथून बर्गर ची आर्डर केली. काही वेळात घरपोच मिळाली परंतू मुख्य पदार्थाची ऑर्डर सोडून भलतेच पदार्थ घरपोच देण्यात आले. यामुळे अमोल विसपुते यांनी स्विगी चे रायडर मुकेश पासवान यांच्याशी संपर्क साधला असता तुमची संपूर्ण ऑर्डर मी पोहच केली आहे असे पासवान यांनी सांगितले त्यानंतर पासवान यांनी कॉल घेणे सुद्धा बंद केले. याचा मनस्ताप झाल्याने अमोल विसपुते यांनी पाथर्डी फाटा येथील बर्गर किंग च्या आउटलेट मध्ये जाऊन चौकशी केली असता विसपुते यांनी केलेली ऑर्डर स्विगी च्या रायडर ने संपूर्ण घेतली नाही आणि ती संपूर्ण पोहच झाली नाही अशी धक्कादायक माहिती मिळाली .

सदर घटने संबंधी जाब विचारला असता स्विगी आणि बर्गर किंग या दोन्ही कंपनीच्या कर्मचारी वर्गाने उडवाउडवीची उत्तर देत विसपुते यांना बाहेरचा रस्ता दाखविला. मनस्ताप घडवीणाऱ्या या घटनेची तक्रार नजीकच्या पोलिस स्टेशन येथे देण्यासाठी गेल्या नंतर सदर तक्रार ग्राहक पंचायती मध्ये केल्यास न्याय मिळेल असे पोलीस कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात आले.

सदर प्रकरणाची तक्रार ग्राहक पंचायत येथे करणार असून

मला कोणतीही नुकसान भरपाई नको परंतु ग्राहकांना होणारा त्रास थांबवा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विसपुते यांनी सांगितले.

अमोल विसपुते यांच्या सोबत राजेश शेळके, अरुण जाधव, प्रसाद अहिरराव आदी नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!