Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperएज्यूकेशन

जावयांना मिळालेली ‘भेट’ मुलींच्या हस्ते ‘गरजुंना’ सुपूर्द

मुद्राय फॉउंडेशन तर्फे अधिक मासाचा अनोखा उपक्रम

नाशिक प्रतिनिधी  अधिक मासाचे औचित्य साधून जावई लोकांनी सासरच्या मंडळींकडून सोने-चांदी, तांबे-पितळ आदींच्या वस्तूंचा स्वीकार न करता स्वतःहून शैक्षणिक साहित्याची मागणी करा आणि ते साहित्य गरजू विद्यार्थी मित्रांना अर्पण करा असे आवाहन मुद्राय युवा फॉउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ठिकाणी शैक्षणिक साहित्य जावयांना भेट देण्यात आले. अनेक जावयांनी हे साहित्य मुद्राय फॉउंडेशन मध्ये जमा केले.

मुद्राय फॉउंडेशन प्रत्येक वर्षी सामाजिक भान जपत जुन महिन्याच्या सुरुवातीस नागरिकांकडून शैक्षणिक साहित्य जमा करते आणि हे साहित्य प्रसिद्ध दैनिक ‘आपलं महानगर’ च्या एक वही मोलाची या उपक्रमाअंतर्गत गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवत असते. यावर्षी देखील अश्याच प्रकारचा उपक्रम राबवत मुद्राय ने शैक्षणिक साहित्य जमा करून ते आपलं महानगर या प्रसिद्ध दैनिका च्या कार्यालयात जमा करून सामाजिक भान जपले.
या उपक्रमात पुणे, पनवेल, नाशिक, ठाणे इत्यादी शहरातून चांगला प्रतिसाद मिळाला.

या जोडप्यांनी लावला हातभार :

कविता पाटीलभैयासाहेब पाटील, राकेश दुर्वेअर्पणा दुर्वे, प्रमोद पाटीलधनश्री पाटील, स्वप्नील करंजकरप्रियांका करंजकर, जितेश पाटीलविद्या पाटील, हेमंत राठोडनीता राठोड, ललित सूर्यवंशीसुचेता सूर्यवंशी यांसोबत अनेक जोडप्यांनी सहभाग घेऊन मुद्राय च्या आवाहनाला प्रतिसाद देत शैक्षणिक साहित्य गरजू विध्यार्थ्यांपर्यत पोहचविण्यासाठी मदत केली.
मुद्राय फॉउंडेशन च्या ठाणे जिल्हाअध्यक्षा नंदा पवार यांनी सदर उपक्रमाची माहिती पसरवून जनजागृती केली.
एक वही मोलाची उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मुद्राय फॉउंडेशनचे अध्यक्ष नितिन देवरे यांनी आभार मानले. जमा झालेले साहित्य मुद्राय चे पदाधिकारी कविता पाटील आणि गायत्री देवरे यांच्या हस्ते आपलं महानगरचे संपादक हेमंत भोसले यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!