E-Paperधर्मलोकल न्यूज़

सिडको – सातपूर मध्ये शोभायात्रा काढून कानबाई रानूबाई चे विसर्जन

कानुबाई बहुउद्देशीय संस्थेमार्फत उत्सव आनंदात साजरा

सिडको प्रतिनिधी : कानबाई माता व रणूबाई माता यांच्या विसर्जन मिरवणुकीनिमित्त सातपूर आणि सिडको परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, देवीचा जयघोष आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रत्येक वर्षी सिडको परिसरात कानुबाई माता बहुउद्देशीय संस्थेमार्फत उत्सव जोरदार आणि उत्साहात साजरा केला जातो. संस्थेचे संस्थापक नितीन माळी यावेळीही परिश्रम घेत उत्सव पार पाडला.

या मिरवणुकीत आमदार सीमा हिरे यांच्या समवेत सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि भाविक यांनी सहभागी होत देवीचे दर्शन घेतले. तसेच महिला, विद्यार्थी यांनी फुगडी खेळत त्यांनी उत्सवाच्या आनंदात सहभाग नोंदवला.

कानबाई माता आणि रणूबाई माता या महाराष्ट्राच्या लोकपरंपरा आणि श्रद्धेशी जोडलेल्या देवता आहेत. या उत्सवाला समाजजीवनात विशेष महत्त्व असून, उत्सवाच्या निमित्ताने महिला एकत्र येत श्रद्धा आणि आनंद व्यक्त करतात. सातपूर आणि सिडको परिसरात या परंपरेचे दर्शन घडले.

आपल्या लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे. अशा उत्सवांमुळे समाजातील एकोपा आणि आपलेपणाची भावना अधिक दृढ होते, विसर्जन मिरवणूकीतील फक्त रस्तावरील खड्यांचे दुःख सोडले तर देवीच्या जयघोषाने आणि पारंपरिक वाद्यांच्या गजराने सातपूर व सिडको परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्यात महिला, भाविक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!