Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paper

सुसाट कारच्या धडकेत वनरक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

सुसाट कारच्या धडकेत वनरक्षकाचादुर्दैवी मृत्यू’

नाशिक : भरधाव वेगाने धावणाऱ्या कारने दिलेल्या धडकेत वनरक्षक गोरख बागुल यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार (दि. १६) रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. इगतपुरी वन परिक्षेत्रात लाकडाची अवैध वाहतूक रोखत कारवाई करून परतणाऱ्या वनपर्यटकाच्या मदतीसाठी वनरक्षक गोरख बागुल हे जात असताना ही घटना घडली.

वनविभागाचे पथक कारवाई करून जप्त केलेला ट्रक घेऊन नाशिकच्या दिशेने येत होते. वनपाल सुनील पवार यांनी पाथर्डी फाटा येथे राहणारे वनरक्षक गोरख बागुल (४८, मुरलीधर नगर, पाथर्डीफाटा नाशिक) यांना मदतीसाठी बोलावून घेतले होते. बागुल हे उडाणपुलाखाली स्वतःचे वाहन उभे करून उडाणपुलावर पायी जात असताना सुसाट कारने त्यांना धडक दिली. ही बाब लक्षात येताच बागुल यांना वन कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले. अपघातातील मृत गोरख बागुल हे माजी सैनिक होते.

अपघाताच्या घटनेनंतर कारचालक रुग्णालयातून कार (क्र. एमएच१५-केके-४८६५) सोडून पसार झाला. जमिनेला खान (रा. अंबड लिंक रोड, सातपूर) असे संबंधित कार चालकाचे नाव आहे. लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक आणि अपघातग्रस्त कार यांच्यामध्ये काही संबंध आहे का? याचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे.

कारमधून वाहन चालकाचा परवाना, आरसी बुक वन अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. कागदपत्रे तपासासाठी पोलिसांकडे सोपविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. घटनेचे वृत्त कळताच उपवनसंरक्षक सिद्धेश सावंदर, सहाय्यक वनसंरक्षक निलेश कांबळे, कल्पना वाघेरे, शेखर देवरकर, पुष्पा सातरकर यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!