भाजपच्या क्रीडा प्रकोष्ठाच्या प्रदेश सहसंयोजकपदी नरेंद्र पायगुडे
आठ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर!

पुणे प्रतिनिधी : ठाणे, मुंबईसह कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रातील सहसंयोजकांचीही निवड; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून नियुक्तीपत्र जारी.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या क्रीडा प्रकोष्ठामध्ये संघटनात्मक स्तरावर महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. क्रीडा प्रकोष्ठाच्या प्रदेश संयोजकपदी श्री. पोपट काळे यांची नियुक्ती करण्यात आली असून, राज्यातील विविध विभागांसाठी आठ सहसंयोजकांची निवड करण्यात आली आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी या नियुक्त्यांचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे.
या नियुक्तीनुसार, ठाणे विभागाच्या सहसंयोजकपदी राम चिकणे, मुंबई विभागाच्या सहसंयोजकपदी रविंद्र करमळकर, मराठवाडा विभागाच्या सहसंयोजकपदी पंकज भारसाकळे, विदर्भ विभागाच्या सहसंयोजकपदी पियुष आंबुलकर, कोकण विभागाच्या सहसंयोजकपदी उदय नाईक, उत्तर महाराष्ट्र विभागाच्या सहसंयोजकपदी तन्मय आढाव, तर पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या सहसंयोजकपदी नरेंद्र पायगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.




