E-Paperटॉप न्यूज़

टोरंट पावर चा भोंगळ कारभार : नागरिक त्रस्त

महावितरण प्रमाणे टोरंट पावर ची दयनीय अवस्था

BIG BREAKING  
वीज नसल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल आणि संताप
भिवंडी प्रतिनिधी : टोरंट पावर ही ग्राहकांना वीज पुरवणारी नामांकित कंपनी असून तीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येतांना दिसत आहे.
भिवंडी परिसरातील मूठवळ आणि इतर ठिकाणी गेल्या 24 तासांपासून वीज पुरवठा खंडीत असल्याचे दिसत आहे.
अनेक ग्राहकांनी तक्रार करून सुद्धा कंपनी कडून उडवा उडवीची उत्तरे मिळत असून ग्राहकांमध्ये रोष निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.
सदर कंपनीकडे ऑनलाईन तक्रार करावी लागत असून त्यामुळे अनेकदा नागरिकांच्या समस्या निराकारण होण्यास अडचणी निर्माण होतात.
(विशेषकर मुंब्रा, ठाणे आणि भिवंडी) परिसरात सदर कंपनी वीज पुरवठा करीत असून टोरेंट पावर (Torrent Power) च्या भोंगळ (अव्यवस्थित) कारभाराविषयी ग्राहकांमध्ये प्रचंड रोष आहे. कंपनीच्या कारभारात अनेक गंभीर त्रुटी आणि समस्या सातत्याने समोर येत आहेत:
  • अवाजवी बिले: वीज वापर कमी असतानाही ग्राहकांना भरमसाठ रकमेची बिले पाठवली जातात.
  • मनमानी वसुली आणि भारनियमन: अनेकदा कोणतीही पूर्वकल्पना न देता वीज कापली जाते आणि मीटर रीडिंग न घेता सरासरी बिलिंग केली जाते.
  • पारदर्शकतेचा अभाव: चुकीच्या बिलांची दुरुस्ती करण्यासाठी किंवा मीटर तपासणीसाठी ग्राहकांना कंपनीच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात.
  • जनआक्रोश: वाढत्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांमध्ये, विशेषत: महिला आणि सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप असून कंपनीविरोधात अनेकदा तीव्र आंदोलने व मोर्चे काढले गेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!