E-Paper
नाशिकचा पेशवेकालीन ‘रहाड’ उत्सव शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा – डॉ. वसंत ठाकूर
सदर मागणीस बालभारती चे आश्वसन

नाशिकचा पेशवेकालीन ‘रहाड’ उत्सव शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावा,
डॉ. वसंत ठाकूर (शहराध्यक्ष, नाशिक शहर काँग्रेस सेवादल) यांच्या मागणीची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) अधिकृत दखल घेतली आहे.
इयत्ता सातवीच्या आगामी इतिहास पुस्तकासाठी स्थापन होणाऱ्या समितीसमोर हा विषय ‘अभिप्रायर्थ’ (निर्णयासाठी) ठेवण्याचे आश्वासन बालभारतीकडून मिळाले आहे. आपल्या संस्कृतीचा आणि
इतिहासाचा गौरव व्हावा यासाठी सेवादलाचा हा पाठपुरावा सातत्याने सुरूच राहील! – डॉ. वसंत ठाकूर




