
‘अधिक मासाचे वान’ म्हणून जावयांनी ‘शैक्षणिक साहित्याची’ मागणी करावी : नितिन देवरे.

हिंदू धर्मात अधिक मास हा एक दुर्मिळ चांद्रमास आहे जो साधारणपणे दर तीन वर्षांनी येतो. या कालावधीत जावई लोकांना सासरची मंडळी स्वतःच्या घरी बोलवून जावई आणि मुलीची पूजा करून त्यांना अधिक मासाचे वान म्हणून सोने चांदी किंवा किमती वस्तू भेट देवून कर्तव्य बजावतांना दिसतात.
यंदाचा अधिक महिना 3 वर्षानंतर आला असून या कालावधीत सामाजिक भान म्हणून जावई लोकांनी सासरच्या मंडळींकडून शैक्षणिक साहित्याची मागणी करा यामध्ये 1 वही, 1 पेन जरी भेट मिळाला तरी ती भेट आनंदाने स्वीकारावी ही शैक्षणिक साहित्याची भेट ‘मुद्राय युवा फॉउंडेशन’ जमा करणार असून जमा झालेले शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थी मित्रांना अर्पण करण्यात येणार आहे असे मुद्राय युवा फॉउंडेशन चे अध्यक्ष नितिन देवरे यांनी सांगितले.
मुद्राय तर्फे प्रत्येक वर्षी शाळा सुरु होण्यापूर्वी लोक वर्गणीतून शैक्षणिक साहित्य जमा केले जाते. या वर्षी अधिक मासाचे औचित्य साधून सदर समाजकार्य करण्यात येत आहे आणि त्यासाठी अनेक समाजसेवकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
बातमीतील फोटो AI आहे.




