त्रंबकेश्वर रोड, खंबाळे येथील बालसदनास 8 आमदारांची सदिच्छा भेट.
सोबत शासकीय अधिकारी उपस्थित.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीच्या आठ ते दहा आमदारांची बालसदनास भेट..

त्रंबकेश्वर : येथील श्रीमती गार्डा बालसदन (अनाथ बालिकाश्रम खंबाळे) त्र्यंबकेश्वर रोड नाशिक येथे महाराष्ट्र विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीच्या अध्यक्ष आमदार मा. मोनिकाताई राजळे यांच्या समवेत आठ ते दहा आमदार आणि अनेक आय. ए. एस अधिकारी इतर विभागीय अधिकारी यांनी भेट देऊन आपल्या विनाअनुदानित संस्थेच्या कार्याची दखल घेऊन संस्थेच्या कार्याबद्दल कौतुक करून मनापासून अभिनंदन केले. या भेटीदरम्यान अध्यक्ष आमदार मा. मोनिकाताई राजळे समवेत नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्षम आमदार मा.सीमाताई हिरे, आमदार मा. ज्योतीताई गायकवाड, आमदार मा. मनिषाताई कायंदे, आमदार मा. मंजुळाताई गावित, आमदार मा. महेश सावंत, आदी आमदार आय. ए. एस अधिकारी मा. प्रितम सनकुळकर, मा. विजय कोमटवार, मा. सीमाताई तांबे, मा. सुनील शिंदे, मा. स्नेहाताई दुबे तसेच महिला व बालकल्याण नाशिक विभागाचे उपायुक्त मा. चंद्रशेखर पगारे, नाशिक जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी मा. सुनील दुसाने व आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कर्मयोगी महंत डाॅ.रत्नाकर पवार.
बालसदन (अनाथ बालिकाश्रम) खंबाळे.




