पानवेली काढण्यासाठी ‘नाशिक च्या प्रहरींना’ साकडे : दत्तू बोडके
खबर पानवेलींच्या विळख्याची

“खबर पानवेलींच्या विळख्याची”
मदतीच्या आवाहनाचा भाग – 1
पानवेली काढण्यासाठी ‘नाशिक च्या प्रहरींना साकडे : दत्तू बोडके
नाशिक महानगरपालिकेतर्फे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना नाशिक चे प्रहरी होण्यासाठी आवाहन करण्यात आले होते आणि त्याचा भव्य दिव्य सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास गिरीश महाजन यांच्या समवेत अनेक मंत्री, आमदार, नगरसेवक, महापौर यांची उपस्थित होती.
हा सोहळा नाशिक पालिकेच्या प्रसिद्ध कालिदास कलामंदिराच्या AC हॉल मध्ये घेण्यात आला होता.
या उपक्रमाचे अभिनंदन करत प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक सेवक यांनी आता गोदावरीत अतिक्रमण केलेल्या पानवेली काढण्यासाठी नाशिक च्या प्रहरिंना मदत करण्याचे साकडे घातले आहे.
नाशिक महानगरपालिकेचा नाशिक चे प्रहरी हा उपक्रम कौतुकास्पद असून सदर उपक्रम फक्त नावापुरताच आणि कागदावर न राहता त्याचा उपयोग नाशिक च्या विविध विकासासाठी रहावा असे मत दत्तू बोडके यांनी व्यक्त केले. या एकादिवसीय सोहळ्यात तयार झालेल्या नाशिक च्या प्रहरिंनी सामाजिक कार्य करण्याची ही संधी दवडू नये आणि गोदावरीत साठलेल्या पानवेली काढण्यापासून आपल्या कामाची सुरुवात करावी असे आवाहन दत्तू बोडके यांनी केले आहे. दत्तू बोडके यांच्या या सामाजिक उपक्रमात किती प्रहरी साथ देतात याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

खबर 24 LIVE या न्यूज पोर्टल मार्फत
“खबर पानवेलींच्या विळख्याची” ही मालिका राबविणार असून नागरिकांनी सदर मालिकेचा अभ्यास करावा असे खबर 24 LIVE मार्फत आवाहन करण्यात आले आहे.




