E-Paperलोकल न्यूज़

घराचे कुलूप तोडून दागिन्यानंसह रोख रक्कम लंपास

अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

सातपूर परिसर : श्रमिक नगर भागातील गणेश पार्क येथील पद्मा लाड यांनी आपली खोली जाकीर कुरेशी यांना भाडे तत्वावर दिली होती. दि. 17 ऑगस्ट रोजी कुरेशी कुटुंब मुलाच्या सत्कार समारंभासाठी नाशिक शहरात कार्यक्रम स्थळी गेले असतांना अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून दागिन्यानंसह रोख रक्कम चोरून नेली.

यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम समवेत 40 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला असून अज्ञात चोरट्या विरोधात सातपूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रशीद कुरेशी हे रिक्षाचालक असून त्यावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. सदर चोरीने कुटुंबावर संकट कोसळले असून लवकरात लवकर चोरट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!