
मुंबई : 9 जुलै रोजी शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद असणार नाहीत.
महाराष्ट्र शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, ९ जुलैला शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.
जरी शिक्षक संघटनांनी टीईटी (TET) नियम, संचमान्यता धोरण आणि (BLO) आणि (SIR) सारख्या अशैक्षणिक कामांच्या निषेधार्थ ‘शाळा बंद’ आंदोलनाची हाक दिली असली तरीही शिक्षण विभागाने शाळा सुरूच राहतील असे स्पष्ट केले आहे.




