“महागाई आणि भ्रष्टाचाराचा” केक कापून लक्षवेधी वाढदिवस साजरा

प्रतिनिधी : पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि मुद्राय फॉउंडेशनचे अध्यक्ष नितिन देवरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक जाणीवेतून महागाई भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या नागरिकांसाठी निषेध म्हणून आगळा वेगळा केक कापण्यात आला.
विविध सण आणि वाढदिवसाच्या निमित्त वेगवेगळे आगळे वेगळे सामाजिक उपक्रम घेणारी संस्था मुद्राय युवा फॉउंडेशन च्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि महागाई, भ्रष्टाचाराच्या जनजागृतीसाठी सदर वाढदिवसाला आगळा वेगळा केक कापण्यात आला.
अश्या प्रकारच्या वाढदिवसानिमित्त तरी शासन आणि प्रशासनाचे डोळे उघडतील आणि नागरिकांच्या वेदनेकडे लक्ष केंद्रित होईल अशी आशा नितिन देवरे यांनी व्यक्त केली. दोन वेळच्या जेवणापासून सर्वच बाबतीत महागाई वाढली असून प्रशासनातील भ्रष्टाचार बोकाळला आहे यांवर आळा घालण्याचे काम शासनाचे आहे. शासनाने यांवर निर्णय घेऊन नागरिकांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन नितिन देवरे पाटील यांनी केले आहे.




