नाशिक महापालिकेवर आली स्वतःचेच नाव आणि चिन्ह ‘पुसण्याची’ वेळ
सोशल मीडियातील व्हायरल व्हिडीओमुळे खळबळ

नाशिक प्रतिनिधी : दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत नाशिक महानगरपालिकेने अधिकृत रित्या आपले नाव आणि चिन्ह टाकून लावलेला दिशादर्शक फलक चांगलाच चर्चेत आला आणि व्हायरल झालेल्या व्हिडीओ नंतर त्याच दिशा दर्शक फालकावरून नाशिक महानगरपालिकेचे नाव आणि चिन्ह पुसण्यात आल्याचे निर्दशनास आल्याचा व्हिडीओ प्रकाशित झाला.

सदर फलक भाजपा महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अजित चव्हाण यांचे निवास स्थानाकडे जाणारी दिशा दर्शवत असणारा होता.
सामाजिक कार्यकर्ते सोमा कुऱ्हाडे यांनी सोशल मीडियावर सदर फालकाची पोलखोल केली आणि अवघ्या काही तासात त्यावरून नाशिक महानगरपालिकेचे नाव आणि चिन्ह पुसण्यात आले.
संपूर्ण शहरात खड्यांचे साम्राज्य निर्माण होतं असतांना नाशिककर जनतेच्या कर स्वरूपात जमा होणारा पैसा सदर फालकांसाठी खर्च करणे योग्य की अयोग्य असा प्रश्न निर्माण होतं आहे. सदर व्हिडीओला नेटकऱ्यांच्या महानगरपालिकेसाठी लाजिरवाण्या कमेंट व्हायरल होतं आहेत.

कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाचे दिशादर्शक फलक जनतेच्या कर स्वरूपातील रकमेतून लावू नयेत अश्या प्रकारच्या मागण्या नाशिककर जनतेकडून आणि नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.



