VTC- साकूर फाटा वृक्षतोडीला तूर्तास स्थगिती
पुढील शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभाग व पर्यावरणप्रेमींचे संयुक्त सर्वेक्षण

नाशिक प्रतिनिधी : VTC फाटा ते साकूर फाटा परिसरात रस्तारुंदीकरणासाठी प्रस्तावित तसेच यापूर्वी झालेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पर्यावरणप्रेमींची बैठक झाली. कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपविभागीय अधिकारी रवींद्र पुरी आणि शाखा अभियंता तुषार मोरे यांच्या उपस्थितीत वृक्षतोडीबाबत चर्चा करण्यात आली.

या प्रकरणी पुढील शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभाग व पर्यावरणप्रेमींच्या उपस्थितीत संयुक्त सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये रस्त्याचे अलाइनमेंट, यापूर्वी तोडण्यात आलेली झाडे, त्यांचे पुनर्रोपण तसेच भरपाई वृक्षलागवडीबाबत पाहणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, संयुक्त सर्वेक्षण होईपर्यंत परिसरातील कोणत्याही झाडाची तोड करण्यात येणार नाही किंवा एकाही झाडाला हात लावला जाणार नाही, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीस याचिकाकर्त्या अश्विनी भाट, याचिकाकर्ते मनीष बाविस्कर, निसर्गसेवक अमित कुलकर्णी, आनंद रॉय यांच्यासह अन्य पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.
VTC फाटा ते साकूर फाटा परिसरात रस्तारुंदीकरणासाठी प्रस्तावित तसेच यापूर्वी झालेल्या वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पर्यावरणप्रेमींची बैठक झाली. कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, उपविभागीय अधिकारी रवींद्र पुरी आणि शाखा अभियंता तुषार मोरे यांच्या उपस्थितीत वृक्षतोडीबाबत चर्चा करण्यात आली.