
भिवंडी तालुक्यातील मूठवळ गावातील जेष्ठ व्यक्ती ह. भ. प. गजानन पाटील यांचे आज दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, जावई, नातवंडे, पत्नी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 4 वाजता राहत्या घरातून निघून अंत्यविधी मूठवळ येथील स्मशान भूमीत करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्याने मूठवळ ग्रामस्थांमध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.



