E-Paper

तोडलेल्या वृक्षांसाठी आज “शोकसभा”

नाशिक : कुंभमेळ्याच्या नावाने आणि विकासाच्या धर्तीवर प्रशासनाकडून शहरात अनेक ठिकाणी भेसुमार वृक्षतोड करण्यात आली. तसेच तपोवन येथील नव्याने वृक्षतोड करण्यात येणार आहे. ही वृक्षतोड थांबावी यासाठी पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमी यांनी कंबर कसून आंदोलनेसुद्धा केली. हरित लवादाने काही दिवसांपूर्ता या वृक्षतोड थांबवली सुद्धा परंतू तोडल्या गेलेल्या वृक्षांचे काय? असा सवाल करत पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी आणि तमाम नाशिककर यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन केले आहे.

आज शनिवार 11 एप्रिल रोजी  पंचवटी परिसरातील तपोवन येथे सकाळी 11 वाजता ही शोकसभा होईल. या शोकसभेसाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.

विकासाच्या नावाखाली जे वृक्ष तोडले गेले ते मरण पावले नसून, “शहिद” झाले आहेत. – पर्यावरण प्रेमी

शहीद झालेल्या प्रत्येक वृक्षाला मानवंदना देण्यासाठी तमाम नाशिककरांनी उपस्थित राहावे अशी विनंती प्रहार संघटनेचे नेते आणि पर्यावरणप्रेमी दत्तू बोडके आणि इतर सर्व वृक्षप्रेमींनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!