Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
क्राइम

विल्होळी कोयता हल्ला प्रकरणात पती पत्नी चा सहभाग

नाशिक : विल्होळी परिसरात कोयत्याने वार झालेला सूरज सोळंकी प्रकरण.

एका महिलेशी सोलंकी यांचा वाद असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर आरोपीचा शोध घेतला असता हनुमंत अण्णासाहेब शिंदे (वय 42) व त्याची पत्नी साधना हनुमंत शिंदे (वय 37, दोघे रा. अंधापुरी, ता. पाथरी, जि. परभणी, हल्ली रा. विठाईनगर, नामको हॉस्पिटलच्या मागे, पेठ रोड, नाशिक) या जोडप्यास ताब्यात घेण्यात आले.

पुढील तपासात या पती-पत्नीपैकी पत्नी साधना हिने दिलेल्या माहितीनुसार जखमी सूरज सोलंकी आणि साधना शिंदे यांची वाडीवर्‍हे येथे एका कंपनीत ओळख झाली. तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते. कालांतराने सूरज सोलंकी हा साधना हिला ब्लॅकमेल करून अनैतिक संबंधाची मागणी करू लागला. संबंध न ठेवल्यास तिच्यासह तिच्या परिवारास जिवे मारण्याची धमकी देऊ लागला.

या गोष्टीचा राग मनात ठेवून आरोपी पती हनुमंत शिंदे व त्याची पत्नी साधना शिंदे यांनी सोलंकी यास विल्होळी शिवारात बोलावले. त्यावेळी झालेल्या झटापटीत सोलंकी याच्या हातावर, मानेवर व डोक्याच्या मागील बाजूस कोयत्याने व दगडाने वार करून मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

दोघा पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक व सहकारी करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!