Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
क्राइम

ती आली आणि कोयत्याने सपासप केले वार

नाशिक शहराला झालंय तरी काय?

नाशिक: गुन्हा घडल्यावर गुन्हाचे व्हिडीओ बनवणाऱ्या नाशिक पोलिसांचा खरंच धाक आहे की नाही, असा प्रश्न उपस्थितीत करणारी घटना घडली आहे. भर रस्त्यावर एका इसमाचा खून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, एक महिलेनं या इसमाच्या तोंडावर कोयत्याने सपासप वार केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील विल्होळे परिसरात ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. रस्त्याच्या बाजूला एक महिला आणि पुरुषाने एका इसमावर हल्ला केला. त्यानंतर त्याचा खून केला. धक्कादायक म्हणजे, हा इसम मृत झाल्यानंतर महिलेनं कोयत्याने या इसमाच्या तोंडावर एकापाठोपाठ ३ वार केले. त्यानंतर तिथून निघून गेले. हा सगळा प्रकार तिथेच उपस्थितीत असलेल्या लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ज्या इसमाचा खून झाला आहे, त्याच्यावर आधी या महिलेनं आणि पुरुषाने मिरचीची पूड टाकून हल्ला केला. इसमाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली, त्यानंतर दोघांनी एकत्र हल्ला केला. सुरुवातीला या इसमाच्या डोक्यात दगड घातला. तो इसम खाली पडल्यानंतर मानेवर आणि डोक्यात कोयत्याने सपासप वार करण्यात आले. हा प्रकार इथंच थांबला नाही, कर या महिलेनं कोयत्याने इसमाच्या चेहऱ्यावर कोयत्याने ३ वार केले. या भयानक हल्ल्यात इसमाचा जागेवरच मृत्यू झाला.
बाईकची नंबर प्लेट झाकलेली!
या इसमाची हत्या केल्यानंतर दोघेही जण दुचाकीवर बसून फरार झाले. पण, तिथून पळून जात असताना बाईकची नंबर प्लेट ही झाकलेली होती. आपल्या बाईकचा नंबर कोणता आहे हे कळू न देण्यासाठी दोघांनी हे कृत्य केलं. घटनास्थळावरून दोघे फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेह आणि हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. पण, भर दिवसा झालेल्या या हत्याकांडामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!