E-Paper
हरित लवादाचा पुन्हा एकदा दणका.

नाशिक : शहरातील सर्वच भागातील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाने दि.२८ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती. तसेच याबाबत नाशिक महापालिका प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. याप्रकरणी आज (दि.२८) रोजी सुनावणी झाली असता राष्ट्रीय हरित लवादाने दि.१९ जून २०२६ पर्यंत स्थगिती कायम ठेवली आहे. अत्यंत निकडीच्या प्रसंगी झाड तोडणे आवश्यक असल्यास त्यासाठी आता थेट हरित लवादाचीच परवानगी घ्यावी लागणार आहे, असे निर्देश लवादाने दिले आहेत. यामुळे वृक्षतोडीबाबत मनपाच्या मनमानी कारभाराला काही प्रमाणावर चाप बसणार आहे.




