E-Paperमहाराष्ट्र

वरुणराज्याच्या उपस्थितीने नागरिक सुखावले; मंत्र्यांच्या अनुपस्थितीने सभागृह दुखावले.

नाशिक, ठाणे, मुंबईत वरून राज्याचे आगमन

2026 च्या पहिल्या पावसात नागरिकांसमवेत छत्री आणि रेनकोट सुद्धा थंड पाण्यात भिजले.

कल्याण प्रतिनिधी : आज दिनांक 23 जुन रोजी शासनाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस अनेक मंत्र्याच्या अनुपस्थितीने गाजला असला तरी दुसरीकडे मात्र वरूण राज्याने धडाकेबाज हजेरी लावत नागरिकांना सुखःद धक्का दिल्याचे पाहण्यास मिळाले.

यावर्षी पावसाळा पुढे पुढे सरकत असतांनाचे चित्र निर्माण झाले होते यामुळे शेतकरी, नागरिक त्याचबरोबर पावसाळी वस्तू विकणारे सामान्य विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. असे असतांना शासनाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाली. आज विरोधकांनी बहिष्कार टाकत आणि मंत्र्यांनी अनुपस्थिती दाखवत पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस पार पडला.

सभागृहात एकमेकांवर तोफ डाकत असतांना अचानक पणे वरुण राज्याने हजेरी लावली आणि नागरिकांमध्ये सुखाची लहर पाहण्यास मिळाली. पहिल्या पावसात चिंब भिजून लहानग्यांनी आनंद साजरा केला तर छत्री आणि रेनकोट घालून नागरिकांनी पावसाचे स्वागत करण्याचे चित्र बघण्यास मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!