E-Paperलोकल न्यूज़

प्रशासकीय अधिकारी खोक्यात, नागरिकांचे आरोग्य धोक्यात : नगरसेवकांचे काही चालेना?

नवीन नाशिक प्रतिनिधी : रायगड चौकातील शिवनेरी गार्डन परिसरात पुन्हा एकदा गढूळ पाणी आणि अळीयुक्त पाणीपुरवठा.

नगरसेवकांना अधिकारी जुमानत नसल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप…
रायगड चौक भागात दुर्गंधीयुक्त गढूळ पाणीपुरवठा होत आहे. तसेच गढूळ पाण्यात आळ्या व घाण आणि दुर्गंधी युक्त पाणी आढळून येत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लोकप्रतिनिधी यांनी आंदोलन तसेच पाठपुरवठा करून सुद्धा मनपा पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी नगरसेवकांना जुमाणात दिसून येत नाही असे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांनी आता कोणाकडे दाद मागावी असे झाले आहे..
महानगरपालिकेच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसापासून हा प्रकार सुरू आहे. नागरिकांनी याबाबत महापालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी लोकप्रतिनिधी यांना सांगूनही समस्या जैसे थे आहे.
प्रशासन डोळेझाकपणा करीत असल्याने महिलांना संताप व्यक्त केला आहे. दुर्गंधीयुक्त पाण्यात अक्षरश अळी निघत आहेत. सकाळी पिण्याच्या पाण्यासोबत दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना पाणी पिणेदेखील मुश्कील झाले आहे. या दूषित पाण्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून, हे दूषित पाणी पिल्याने अनेक लोक आजारीदेखील पडले आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांचा जीवदेखील जाऊ शकतो. अनेक दिवसांपासून असे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे…..

वाईट परिस्थिती आहे, नविन नाशिक विभागाची..अधिकारी खरंच लोकप्रतिनिधी यांना जुमाणत नाही… एकच अधिकाऱ्याला तीन तीन विभागाचा पदभार सांभाळायला दिला आहे तो तर असा वागतो कि जशा तोच आयुक्त आहे…

यावर लवकर तोडगा जर निघाला नाही तर येत्या काळात अधिकाऱ्याला घेराव घातल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा सामाजिक पदधिकारी छावा क्रांतिवीर सेनेचे महानगरप्रमुख, एकनिष्ठ युवा फॉउंडेशन चे संस्थापक योगेश गांगुर्डे यांनी दिला आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!