लोकल न्यूज़

आंघोळीचा साबण खाल्लाने तरुणाचा मृत्यू.

नाशिक प्रतिनिधी : चेतनानगर भागात धक्कादायक घटना समोर आली असून आंघोळीचा साबण खाल्लाने 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी परिसरात हळहळ व्यक्त होत असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अथर्व विनायक द्विवेदी (वय 20 रा. श्रीमंगळ कॉम्प्लेक्स, कशिश हॉटेल जवळ) असे मृत्यू तरुणाचे नाव असून सोमवारी दुपारच्या सुमारास अथर्वने राहत्या घरात साबण खाल्ला ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने अथर्वला जिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतू वैद्यकीय तपासणी नंतर त्यास मृत्यू घोषित करण्यात आले.

या घटनेची पोलिसात नोंद झाली असून अथर्वने साबण का खाल्ला याबद्दल स्पष्ट माहिती मिळू शकली नाही.

पोलिस अधिक तपास करीत असून अश्या प्रकारच्या विचित्र घटनेमुळे कुटुंबायांवर शोककळा पसरली आहे. तसेच परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!