E-Paperसामाजिक

नवरदेवाचे पाहुण्यांसाठी आगळेवेगळे निमंत्रण

मुद्राय चे जिल्हाप्रमुख निरंजन पाटील यांचे वक्तव्य

चाळीसगाव प्रतिनिधी : मुद्राय फॉउंडेशन चे जळगाव जिल्हा प्रमुख आणि भाजपा युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष निरंजन पाटील यांचा विवाह नवी मुंबई येथील स्नेहा पाटील यांच्याशी होणार असून हा सोहळा सोमवार दि. 22 जुन रोजी चाळीसगाव येथे संपन्न होणार आहे.

हिंदू धर्मात विवाह सोहळ्याला महत्व असून मित्र परिवार आणि नातेवाईक मंडळी  नवदाम्पत्यास विविध भेटवस्तू किंवा रक्कम ‘आहेर’ म्हणून देत असतात परंतू जन्मापासून पारिवारिक, सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेल्या निरंजन पाटील यांनी येणाऱ्या पाहुण्यांना आगळे वेगळे निमंत्रण केले आहे.

माझ्या विवाहा निमित्त कोणतीही भेटवस्तू आणू नये. आणि भेट म्हणून काही आणायचे असल्यास ‘शैक्षणिक साहित्य’ किंवा ‘समाजपयोगी वस्तू’ आणल्यास त्याचा आवर्जून स्वीकार करणार असल्याचे निरंजन पाटील यांनी सांगितले.

निरंजन पाटील हे शासकीय नोंदणीकृत सामाजिक संस्था मुद्राय युवा फॉउंडेशनचे जळगाव जिल्हा प्रमुख असून राजकीय क्षेत्रातसुद्धा त्यांचा नवलोकिक आहे. लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांचकडून आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राभविले गेले. स्वतःचा विवाह सोहळा सुद्धा सामाजिक भान राखून करण्याचा त्याचा मानस असून त्यांनी केलेल्या अहवानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!