Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperलोकल न्यूज़सामाजिक

‘पर्यावरणपूरक’ गणपती विसर्जनाच्या आदर्श उपक्रमाची परंपरा कायम

'तपोवन' वाचविण्याची प्रार्थना करत बाप्पाला निरोप

नवीन नाशिक : गणेशोत्सव हा आनंद, श्रद्धा आणि एकतेचा सण आहे. मात्र गणपती विसर्जन करताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही देखील आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच विचारातून देवरे कुटुंबाने यंदाही पर्यावरणपूरक पद्धतीने गणपती विसर्जन करण्याची परंपरा कायम राखली.

दरवर्षी प्रमाणे देवरे कुटुंबाने शाडू मातीची गणेशमूर्ती, नैसर्गिक फुले व सजावटीचा वापर केला. तसेच प्लास्टिक, थर्माकोल आणि रासायनिक रंगांचा वापर टाळून घरगुती विसर्जन करण्याचा पर्यावरणपूरक मार्ग स्वीकारला.

नदी, तलाव आणि समुद्राचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनीही पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करावा आणि शक्यतो घरगुती किंवा कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावे, असे आवाहन गायत्री देवरे यांनी केले.

“माझा गणपती, माझी जबाबदारी!” हा संदेश देत देवरे कुटुंबाने पर्यावरण संवर्धनाचा छोटासा पण महत्त्वपूर्ण प्रयत्न केला आहे. अशा उपक्रमातून इतर नागरिकांनाही प्रेरणा मिळून स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणासाठी हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!