City Centre मॉल च्या कर्मचाऱ्यांकडून पत्रकार महिलेला उद्धट भाषा

नाशिक : याठिकाणी नामांकित असलेल्या city centre mall याठिकाणी सुशिक्षित पत्रकार महिलेस मॉल कर्मचारी वर्गाकडून अपमानास्पद भाषेने गैर वागणूक देण्यात आली.
खबर 24 LIVE या न्यूज पोर्टल च्या संपादिका कविता पाटील या सिटी सेंटर मॉल त्रिमूर्ती चौक नाशिक येथे खरेदी साठी गेल्या असतांना त्यांचा मुलगा आर्यन पाटील हा त्याच्या कॉलेजसाठी असलेल्या कामा निमित्त स्केच काढत बसला होता सदर विद्यार्थी मुबंई येथे बी. डिझाईन मध्ये शिक्षण घेत असून गेले चार वर्ष नाशिक येथील नामांकित शिक्षण संस्थेत डिझाईन चे शिक्षण घेत होता. गेले चार वर्ष अनेक विध्यार्थी महाविद्यालयातील गृहपाठ म्हणून सिटी सेंटर मॉल येथे लाईव्ह स्केच ( रेखाचित्र) काढण्याचे काम करीत होते त्यावेळी मॉल मधील कोणत्याही कर्मचारी वर्गाने कोणत्याही विद्यार्थीस हटकले नाही.
आज आर्यन पाटील हा आपल्या महाविद्यालयातील गृहपाठ करीत असतांना मॉल मधील सेक्युरिटी वर्गाने त्यास हटकले. सदर विध्यार्थ्यांची आई कविता पाटील त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी मुलाला हटकल्या बद्दल मॉल मधील सेक्युरिटी कर्मचारी वर्गास जाब विचारला तेव्हा सेक्युरिटी कर्मचारी यांनी मॉल मधील अन्य कर्मचारी वर्गास बोलावून कविता पाटील आणि आर्यन पाटील यांना उद्धट भाषा वापरून मॉल मधून हाकलून देण्याची धमकी दिली.
सदर महिलेने मॉल प्रशासनास आणि व्यवस्थापनास मेल द्वारे तक्रार केली असून पुढील कारवाई करणार आहे.
नामांकित मॉल कर्मचारी वर्गाकडून पत्रकार महिलेस अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य जनतेने कुठे न्याय मागावा अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून होतं आहे.



