E-Paperसामाजिक

नाशिकचे पक्षी मानचिन्ह निवडण्याचा अधिकार नेमका कोणाचा?

नाशिक शहराचे पक्षी मानचिन्ह निवडण्याचा उपक्रम एका संस्थेमार्फत राबवला जात आहे, ही चांगली बाब आहे. मात्र, या प्रक्रियेत प्रशासनाचाही सहभाग असल्यामुळे हा विषय केवळ एका संस्थेपुरता मर्यादित राहत नाही. तो संपूर्ण नाशिक शहराच्या पर्यावरणीय ओळखीशी संबंधित ठरतो.

जर ही निवड केवळ एका विशिष्ट संस्थेच्या अंतर्गत मर्यादित असती, तर कदाचित त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असता. परंतु प्रशासनाचा सहभाग असताना ही प्रक्रिया अधिक व्यापक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक असणे अपेक्षित आहे.

आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नागरिकांचा सहभाग!

नाशिक शहराची लोकसंख्या साधारण २५ लाखांच्या आसपास असताना, या निवड प्रक्रियेत केवळ २७०० ते २८०० नागरिकांनी मतदान केल्याची माहिती मिळत आहे.

मग एवढ्या मर्यादित मतदानातून संपूर्ण नाशिक शहराचे जनमत प्रतिबिंबित होते, असे कसे म्हणता येईल?

शहराचे मानचिन्ह ठरवताना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे. त्यांना मतदानाची संधी मिळाली पाहिजे. पक्षिमित्र, पक्षी अभ्यासक, पर्यावरणप्रेमी, शैक्षणिक संस्था आणि सामान्य नागरिक यांचाही सहभाग असला पाहिजे.

आमची मागणी कोणत्याही पक्ष्याच्या विरोधात नाही आणि कोणत्याही संस्थेच्या उपक्रमालाही विरोध नाही.

आमचा आग्रह एवढाच आहे की,

🌿 पर्यायांची व्याप्ती वाढवा.
🌿 निवड प्रक्रियेचे निकष स्पष्ट करा.
🌿 नागरिकांचा सहभाग वाढवा.
🌿 सर्व पक्षिमित्र आणि तज्ज्ञांची मते जाणून घ्या.
🌿 पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीने अंतिम निर्णय घ्या.

२५ लाखांच्या शहराचे पक्षी मानचिन्ह ठरवताना केवळ २७००-२८०० मतांवर समाधान मानायचे का? की खऱ्या अर्थाने संपूर्ण नाशिककरांना सहभागी करून घ्यायचे?

हा विरोधाचा विषय नाही, तर नाशिकच्या नैसर्गिक ओळखीचा आणि लोकसहभागाचा विषय आहे!

निर्णय नाशिकचा असेल, तर सहभागही नाशिककरांचा असला पाहिजे!

अमित कुलकर्णी – अध्यक्ष
निसर्गसेवक युवा मंच

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!