देश

मोदींच्या ‘धन’ की ‘बात’ मुळे ‘जावई’ लोक ‘नाराज’ : सोशल मिडीयातून नेटकऱ्यांच्या जोरदार कमेंट्स..

संकटात कोण? 'देश' की 'नागरिक'.

मोदींच्या ‘मन’ की बात मध्ये ‘धना’ चा मुद्दा

दिल्ली (दि. 11 मे) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला संबोधित करतांना देशातील जनतेने पैसे कश्या प्रकारे वाचवावेत आणि देशाची अर्थ व्यवस्था कश्या प्रकारे सांभाळावी. या विषयी मार्गदर्शन केले.

आखाती देशातील युद्धामुळे आपल्या देशाला बसलेला आर्थिक फटका आणि त्यामुळे संकटात आलेल्या देशाला कश्या प्रकारे सावरता येईल. त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला ‘देशभक्ती’ दाखवण्याची वेळ आली असून, देशहितासाठी काय करता येईल याचे सर्व मुद्दे पंतप्रधान मोदी यांनी मांडले.

नागरिकांनी वर्क फ्रॉम होम, शाळा क्लासेस ऑनलाईन, परदेश दौरे करू नये, इंधनाचा कमी वापर, खाद्य तेलाचा कमी वापर, गॅस चा जपून वापर, विजेचा कमी वापर, सोने खरेदी करू नये अश्या प्रकारचे हायब्रीड विचार देशवासियांनी अमलात आणावे असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. करोना काळात जश्या प्रकारे जीवन व्यवस्था होती तशीच काहीशी व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी मोदी यांचे प्रयत्न आहेत. यांपासून अनेक फायदे होणार असले तरी नागरिक अश्या प्रकारे जीवन जगण्यास तयार होतील की नाही याचा विचार केलेला नसल्याचे नेटकऱ्यांच्या कमेंट्स मधून बघण्यास मिळत आहे.

कमेंट्स चे काही निवडक मुद्दे :

  • नेत्यांचे परदेश दौरे वर्क फ्रॉम ऑफिस करा.
  • नेत्यांना घरातील लग्न कार्य साध्या पद्धतीने आणि सोन्याचे दागिने खरेदी ‘न’ करण्याची सक्ती करा.
  • नेत्यांच्या घरातील लग्नकार्यात आणि इतर कार्यक्रमात जेवणाची मेजवानी बंद करून खाद्य तेलास आळा घाला.
  • ज्या देशाला ‘सोने की चिडिया’ म्हटले जायचे त्याच देशाल आज ‘सोनं विकत घेऊ नका’ असे सांगण्याची वेळ आली.
  • स्वतः पंतप्रधानांनी काही काळ परदेश दौरे रद्द करावेत.
  • अधिक मासात सोनं खरेदी ‘न’ करण्याच्या आवाहनावर जावई लोकांमध्ये तीव्र नाराजी.
  • रासायनिक खते कमी वापरा किंवा शेतजमिनी विकून टाका.
  • निवडणुकी आधी भाषणात इंधन, गॅस तुटवडा नाही असे सांगितले गेले आणि निवडणुकी नंतर लगेच इंधन, गँस तुटवडा निर्माण झाला.
  • प्रत्येकाला 15 लाख भेटणार आहे इथून सुरु झालेला प्रवास, तुमच्याकडे जमा असलेले पैसे पण खर्चू नका इथपर्यंत येऊन पोहचलाय…
  • आमदार, खासदारांचे पेन्शन रद्द करा.

अश्या प्रकारच्या कमेंट्स ने व्हाट्सअप, फेसबुक, इन्स्टाग्राम पूर्णपणे भरले ओसांडून वाहत आहे. यामुळे कालपासून नेटकऱ्यांचे मनोरंजन होतांना दिसत आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून पहिली सुरुवात ‘तुम्ही करा’ मग ‘आम्ही सुधारू’ असा काहीसा सांगण्याचा प्रयत्न मांडला गेलाय आणि नेते मंडळींवर कायमच असलेला रोष पाहण्यास मिळत आहे.

काही नेटकऱ्यानीं  मोदींच्या सदर वक्तव्यास ‘मोदींची बचत योजना’ असे नाव दिल्याचे पाहण्यास मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!