E-Paper

हृदयद्रावक : विद्यार्थी शोधमोहीम काम करतांना उन्हामुळे शिक्षकाचा मृत्यू.

विद्यार्थी शोध मोहिमेदरम्यान शिक्षकाचा मृत्यू
शिक्षण क्षेत्रात हळहळ, शोककळा पसरली
भद्रावती | प्रतिनिधी
सध्या राज्यात तीव्र उन्हाची दाहकता जाणवत असताना शाळांची पटसंख्या कायम राखण्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेत रस्त्यावर उतरावे लागत आहे. अशाच एका मोहिमेदरम्यान जिल्हा परिषद हायस्कूल भद्रावती येथील माध्यमिक विभागातील आदर्श व विद्यार्थीप्रिय शिक्षक राजू हिवंज यांचे काल रविवारी अकस्मात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील विद्यार्थी संख्या टिकवण्यासाठी सुरू असलेल्या विद्यार्थी शोध मोहिमेत राजू हिवंज सर हे भर उन्हात विविध ठिकाणी पालक व विद्यार्थ्यांच्या भेटी घेत होते. या काळात राज्य शासनामार्फत शिक्षकांवर जनगणना २०२७ ची अतिरिक्त जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
काही दिवसांपासून तीव्र उन्हात सातत्याने काम करत असताना मोहिमेदरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले. घरी परतल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील दोन ते तीन दिवस ते अतिदक्षता विभागात उपचाराखाली होते. मात्र आज त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे दुःखद निधन झाले.
त्यांच्या मृत्यूमागे उष्माघाताची शक्यता वर्तवली जात असली तरी अधिकृत कारण स्पष्ट झालेले नाही. भर उन्हात सुरू असलेल्या या कामकाजामुळे शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!