
महाराष्ट्राचे राजकारण : महाराष्ट्रात घोडेबाजार होतो, अमित शाहांच्या विरोधात घोषणा देणं चूक आहे का? न्यायालयाचा पोलिसांना थेट प्रश्न?
पेपर फुटतो त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही का? आंदोलन करायचे नाही का? असा परखड प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी केला आहे. या संदर्भात त्यांनी पोलिसांची कानउघाडणी केली.
एसडीपीआय पक्षाचे सरचिटणीस सईद अहमद अब्दुल वहिद चौधरी यांनी सीएए आणि केंद्र शासनाच्या कायद्यांच्या विरोधात विविध आंदोलने केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर पाच गुन्हे दाखल केले. एक वर्षासाठी त्यांना तडीपार करण्यात आले.
तडीपारीच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सईद अहमद यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्याची सुनावणी न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यापुढे झाली. यावेळी न्यायमूर्तींनी सध्याच्या घटनांवर चर्चेदरम्यान तोंडी मतप्रदर्शन केले. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला.




