
नाशिक : जनगणना आदेश रद्द करण्याबाबत निवेदन.
दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटनेचे राज्यध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांच्या मार्फत निवासी अप्पर जिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांना दिव्यांग बांधवांना जनगणना आदेश ‘न’ देण्याबाबत व दिलेले आदेश रद्द करण्याबाबत निवेदन देण्यात आले. आदेश रद्द करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच दिव्यांग बांधवांना दिलेले बीएलओ आदेश रद्द करण्याबाबत ही चर्चा करण्यात आली.
राजपूत यांनी सर्व दिव्यांग बांधवांच्या प्रती सहानुभूतीपूर्वक विचार करून जनगणना आदेश रद्द करण्याबाबत मा.तहसीलदार साहेब यांना सूचना देऊन आदेश रद्द करण्याबाबत त्यांना सांगण्यात येईल असे सांगितले .या वेळी भालनोर सर (राज्य सहसचिव), महाले (राज्य प्रसिद्धीप्रमुख), लक्ष्मण राठोड (नाशिक तालुकाध्यक्ष), मोहन राठोड (तालुका कार्याध्यक्ष), मंगला विसपुते, माधुरी नागपुरे, विजय तुपलोंढे, विलास पाटील, वैशाली ठाकूर, सुधीर बोरसे, ज्योती परदेशी, विजय सूर्यवंशी, संगीता गांगुर्डे, कोकणी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.




