लोकल न्यूज़

नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्यावर गुन्हा दाखल.

नवीन नाशिक (प्रतिनिधी) : येथील कामटवाडे परिसरातील सार्वजनिक सिडकोतील नगरसेविका सुवर्णा मटाले यांच्यावर गुन्हा दाखल.

 सिडकोतील कामटवाडे परिसरात सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नगरसेविका सुवर्ण मटाले यांच्यासह एका व्यक्तीवर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२) रात्री सुमारे १०.३० वाजेच्या सुमारास गजलक्ष्मी रो हाऊस, वृंदावननगर, कामटवाडे येथे लग्न समारंभासाठी सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी संबंधितांना मंडप हटवण्यास सांगितले असता, आयोजक दादाजी नामदेव भामरे यांनी आदेशाचे उल्लंघन केल्याचे समोर आले, तसेच नगरसेविका सुवर्ण मटाले यांनी आयोजकांना प्रोत्साहन देत पोलिसांच्या कारवाईला विरोध केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस करत आहेत.

 

 

या प्रकरणाबद्दल मला कोणतीही कल्पना नाही. आमच्या परिसरात एक लग्न समारंभ असल्याने रस्त्याच्या कडेला स्टेज उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होत नव्हती. पोलिसांनी आयोजकांना स्टेज हटवण्यास सांगितले होते. त्यानंतर मी केवळ दूरध्वनीवरून पोलिसांशी संपर्क साधून विनंती केली होती. त्या समारंभाला मी प्रत्यक्ष उपस्थितही नव्हते.”
— सुवर्ण मटाले, नगरसेविका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!