क्राइम

खुटवड नगरला ‘धूम’ स्टाईल चोरी, 1.5 लाखाचा फोन हातोहात गायब.

खुटवड नगर (नाशिक) : ‘धूम’ चित्रपटातील दृश्याला लाजवेल असा प्रकार नवीन नाशिक मधील खुटवड नगर येथे घडला.

1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी खुटवड नगर येथील डॉ. भामरे यांच्या क्लिनिक शेजारी, राहुल कॉप्युटर च्या समोर एक तरुण दुचाकीवर बसून मोबाईलवर काहीतरी काम करत असतांना दुचाकीवर अतिशय वेगाने येऊन दोन चोरट्यानीं हातातील मोबाईल हिसकावून नेला. सदर घटनेने परिसरात भीतीची वातावरण असून घडलेल्या घटनेचा गुन्हा अंबड पोलिस स्टेशन येथे दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस करत असून अश्या प्रकारच्या घटना कधी थांबणार याची वाट नागरिकांना बघावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!