
शाळेत शिकलेली “भारत माझा देश आहे” ही प्रतिज्ञा आपण रोज म्हणतो. पण जेव्हा रस्त्यावरचा कचरा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान किंवा भ्रष्टाचाराचे चित्र दिसते, तेव्हा प्रश्न पडतो की हा देश खरोखर आपलासा वाटतो का? अधिकार मागताना पुढे असणारा नागरिक कर्तव्याच्यावेळी मागे हटतो, तेव्हा हा प्रश्न अधिक तीव्र होतो. आपले आत्मपरीक्षण आणि वागणूक आपण घराबाहेर पडल्यावर रस्ते, रेल्वे आणि सार्वजनिक जागांची काळजी घेत नाही.”ही माझी संपत्ती आहे” हा भाव निर्माण झाल्याशिवाय आपलेपण येत नाही.
भारत ‘माझा’ देश आहे , खरच ? मी आणि माझ घर या पलीकडे आपण कधी विचार करतो का ? घरातला कचरा कचराकुंडीत टाकतानाही आपण जराही काळजी घेत नाही. सरळ भिरकावून देण्याचा प्रयत्न करतो. मग तो कचरा कुंडीत वा बाहेर आपल्याला काळजी नसते . कारण हा रस्ता आपला नसतो. बसमधुन प्रवास करताना बसची आसने फाडली जातात त्यातुन स्पंज काढला जातो. कारण बस आपली नसते. देशातील विविध स्मारक ,पर्यटन स्थळ इथं जाऊन आपण परिसर अस्वच्छ करतो.अयोग्य मजकूर लिहिला जातो. कारण ही स्मारक ,पर्यटन स्थळ आपली नसतात. इथले रस्ते, बगिचे, कार्यालय, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, जंगलं, स्मारक, पर्यटन स्थळ यातल आपल काहिच नसत. म्हणून याची कोणतीही जवाबदारी आपल्यावर नाही. हे सगळ आपल नाही तर आपल काय आहे या देशात. म्हणूनच प्रश्न पडतो, खरच भारत ‘माझा’ देश आहे ?
फक्त कायदे किंवा सरकार बदलून देश बदलत नाही, तर आपली मानवी मानसिकता बदलावी लागते. हक्क आणि कर्तव्येस्वातंत्र्य मिळाले म्हणजे सर्व काही फुकट किंवा हवे तसे वागण्याचे स्वातंत्र्य नव्हे. देशातील प्रत्येक समस्येकडे “ही माझी जबाबदारी आहे” म्हणून पाहण्याची गरज आहे.जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखात आणि देशाच्या विकासात स्वतःला जोडतो, तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने “माझा” होतो.




