Welcome to Khabar 24 Live   Click to listen highlighted text! Welcome to Khabar 24 Live
E-Paperएज्यूकेशनदेश

राष्ट्रपतींच्या हस्ते नाशिकच्या शिक्षिका कुंदा बच्छाव यांना पुरस्कार

दिल्ली येथे सन्मान सपन्न

पीटीआय, नवी दिल्ली : मुलींचे बालविवाह रोखून त्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या नाशिकच्या कुंदा जयवंत बच्छाव यांच्यासह देशातील ८२ गुणवंत शिक्षकांना शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीत आयोजित विशेष समारंभात हा गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील ‘शैक्षणिक पालकत्वा’च्या प्रयोगासोबतच टाकाऊ वस्तूंपासून बनवलेले सायन्स पार्क, हातगाडीवरील हॅमोबाईल सायन्स लॅब’ आणि क्यूआर कोड आधारित ‘ट्री टॉक’ अशा विविध कल्पक उपक्रमांनी यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली छाप पाडली.
कुंदा बच्छाव यांनी १५० हून अधिक वंचित आणि गरजू मुलींना आर्थिक आणि शैक्षणिक आधार दिला. त्यामुळे या मुलींचे बालविवाह रोखण्यास मदत झाली आणि त्यांच्यासाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. कुंदा बच्छाव यांनी लॅब आणि क्यूआर कोड आधारित हॅट्री टॉक’ अशा विविध कल्पक उपक्रमांनी यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली छाप पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!