Uncategorizedक्राइम

नाशिक जिल्हा…व्हिडीओ क्लिप चा बालेकिल्ला??

खरात पार्ट 2

एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरण सुरु असतानांच पुन्हा नाशिक शहरातील सातपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावर अश्लील फोटो व व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील फिर्यादीवरच आता लैंगिक शोषण तसेच अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर पोलीस ठाण्यात २ एप्रिल रोजी एका ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणाच्या तपासादरम्यान अटक आरोपींकडून चार मोबाईल, दोन पेनड्राइव्ह आणि एक मेमरी कार्ड जप्त करण्यात आले होते त्याची पोलिसांनी पडताळणी केली असता फिर्यादीच्या विविध महिला मैत्रिणींचे अश्लील व्हिडिओ चित्रण आढळून आले असून एकूण १२१ व्हिडिओ क्लिप्स सापडल्या आहेत. या सर्व सामग्रीची पोलीसांकडुन पुढील तपासणी सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी रवींद्र एरंडेवरच लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!