क्राइम

अतिप्रसंग करीत असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्याला निसर्गप्रेमिंनी घडविली अद्दल.

बेकायदा वृक्षतोड! प्रशासनाचा मनमानी कारभार थांबणार कधी??

  • याला निसर्गावर झालेला अतिप्रसंग म्हणू नये? तर अजून काय म्हणावे??
  • अवैध वृक्षतोडीनंतर प्रशासनाकडून पुन्हा वृक्षारोपण करून घेतले निसर्गप्रेमींच्या जागरूकतेचा विजय! नाशिकच्या छत्रपती संभाजी चौक (सातपूर) येथे MECB द्वारे मिनी पिलर बसवताना एका बदामाच्या झाडाची अवैध वृक्षतोड करण्यात आली होती. उद्यान विभागाने यासाठी कोणतीही परवानगी दिली नव्हती, तरीही हे काम सुरू होते. या गंभीर प्रकाराबद्दल आम्ही जाब विचारल्यानंतर आणि सातपूर विभागाचे अधिकारी श्री. रवींद्र गुंजाळ यांच्याशी चर्चा केल्यानंतर, प्रशासनाने आपली चूक मान्य केली. केवळ तक्रार करून न थांबता, आम्ही पाठपुरावा करून त्याच ठिकाणी डिव्हिडरमध्ये पुन्हा नवीन झाड लावून घेतले आहे. शासकीय कामे करताना निसर्गाचे नुकसान होणार नाही, याची काळजी विभागाने घेणे आवश्यक आहे. आजच्या या कारवाईतून आम्ही हेच दाखवून दिले की, सजग नागरिक सोबत असतील तर पर्यावरणाचे रक्षण नक्कीच होऊ शकते. यावेळी निसर्गसेवक अमित कुलकर्णी, राहुल पाटील, बाळासाहेब मथुरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!