
मुबंई प्रतिनिधी : महिला आरक्षण नापास झाल्याने सत्ताधारी भाजपने मुबंई येथे मोर्चा काढला होता. या मोर्चामुळे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. यामध्ये एक महिला चांगलीच भडकली आणि तिने संकट मोचन गिरीश महाजन यांना सज्जड दम भरला यामुळे संकरमोचन गिरीश महाजन संकटात सापडले. वरळी येथील मोर्चामुळे ऑफिस साठी आणि शाळेत निघालेल्या नागरिकांना अडचणींनीचा सामना करावा लागला. गेट आऊट असे म्हणत त्या महिलेने मंत्री महोदय यांना चांगले सुनावले.
सत्ताधारी पक्षच मोर्चा काढत असल्याने काही काळ हास्यास्पद वातावरण निर्माण झाले होते.



