“बास झालं” समिती बरखास्त करा : जरांगे पाटील भडकले.

धारशीव प्रतिनिधी : मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा अशी थेट मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केली आहे. उपसमितीचे अध्यक्ष पदावरून विखे पाटील नाव कमवतील असं वाटत होतं मात्र त्यांनी नाव घालवलं, असा थेट हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाच्या हक्क आणि प्रश्नासाठी स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे देखील जरांगे पाटील म्हणाले. धाराशिव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपससमितीने मराठा समाजाच्या सुखदुःखाकडे लक्ष द्यायचं असतं मात्र त्या साठी त्यांच्याकडे वेळ नाही विदुषकी लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे. सातारा गॅजेटसाठी आठ महिने उलटून गेले आणखी किती दिवस वाट पाहायची असा सवाल करत जरांगे पाटील यांनी विखे पाटलांवर निशाणा साधला.
मराठा समाजाच्या पूर्णवेळ कामासाठी स्वतंत्र मंत्रालय गरजेचं आहे, असे देखील ते म्हणाले.



