इंटरनेट अभावी महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयातील कामकाज ठप्प.
आंदोलनाचा इशारा - अडोव्होकेट सुरेश आव्हाड

पंचवटी प्रतिनिधी : इंटरनेट सुविधे अभावी महानगर पालिकेच्या पंचवटी विभागातील कामे ठप्प
गेल्या काही दिवसांपासून महानगर पालिकेच्या पंचवटी विभागातील जन्म तसेच मृत्यू नोंदणी प्रमाण पत्र वेळेत वितरित होत नसून विवाह नोंदणी करण्यासाठी देखील वेळ काढू पना केला जात असून,जाणून बुजून नागरिकांना शुल्लक कारणावरून फेऱ्या माराव्या लागत असल्याची तक्रार ॲड सुरेश आव्हाड यांनी विभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून सदरील प्रकरणा मध्ये लक्ष घालून त्वरित नागरिकांना सुरळीत सेवा पुरवण्या बाबत मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, ड्रीम कॅस्टेल ते मखमलाबाद रस्ता अनेक दिवसांपासून खोदून ठेवण्यात आला असून सदरील काम बंद असल्याने सदरील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत.तरी सदरील रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे. काही नगरसेवकांनी श्रीकृष्ण नगर मानकर मळा येथील पिण्याच्या पाण्याची लाइन टाकायचे काम बंद पाडले असून सदरील काम सुरू करण्यात यावे. तसेच नवनाथ नगर मध्ये पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी टाकण्यात यावी.जलवाहिनीचे केलेले कामामुळे रस्ता खोदण्यात आलेला असून सदरील रस्ता दुरुस्त करण्यात यावा.अमरधाम मध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात येवून तेथील रक्षा वाहून नेणाऱ्या नाल्या स्वच्छ कराव्यात.आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.




