E-Paper

‘नाशिक चे प्रहरी’ पुरस्काराने निसर्गसेवक अमित कुलकर्णी सन्मानीत.

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण.

नाशिक प्रतिनिधी (दि. 1 मे) : नाशिक महानगर पालिका यांच्या उन्नत नाशिक अभियाना अंतर्गत नाशिकचे प्रहरी पुरस्काराचे वितरण.

नाशिकच्या प्रगतीमध्ये सामाजिक संस्था आणि सामाजिक सेवकांचा मोलाचा वाटा आहे या कारणाने नाशिक महानगरपालिकेतर्फे उन्नत नाशिक या अभियाना अंतर्गत ‘नाशिक चे प्रहरी’ या मानाच्या पुरस्काराचे वितरण समाजसेवकांना करण्यात आले.

यामध्ये अनेक वर्ष नंदिनी नदीच्या विकासासाठी साठी झटणाऱ्या निसर्गसेवक अमित कुलकर्णी यांना सन्मानीत करण्यात आले. सदर पुरस्काराचे वितरण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

या गौरवशाली सोहळ्यात मंत्री गिरीश महाजन यांसोबत महापौर हिमगौरी आहेर – आडके, मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, किशोर दराडे, सत्यजित तांबे, देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, सरोज अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या ९ ते १० वर्षांपासून नंदिनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांची, तसेच “नंदिनी दूत” म्हणून नाशिकच्या विकास, स्वच्छता, जनजागृती आणि सामाजिक कार्यासाठी केलेल्या कार्याची ही गौरवपूर्ण पावती आहे. असे अमित कुलकर्णी यांनी खबर 24 LIVE शी बोलतांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!