खबर – मरण यातना : ओ.. ‘मनपा’ वाले, प्रेताची तरी ‘मारू’ नका.
स्मशानभूमितील अंधारात प्रेताचा प्रकाश.
नवीन नाशिक : येथील मोरवाडी स्मशान भूमीत दि. 7 मे च्या रात्री प्रेताला सुद्धा संताप येईल अशी घटना घडली.
अशी मरण यातना कोणालाही ‘न’ मिळो अशी चर्चा स्मशान भूमीत जमलेल्या नागरिकांमध्ये होतांना दिसली. नवीन नाशिक येथील मोरवाडी ठिकाणी असलेल्या स्मशान भूमितील दुरावस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून महानगरपालिका कश्या प्रकारे दुर्लक्ष करते हे जगजाहीर होतांना दिसले.
काल रात्री अंत्यविधी साठी आलेल्या प्रेताला लाज वाटेल अश्या प्रकारची कामगिरी मनपा कडून बघण्यास मिळाली. स्म्शानभूमितील अंधार याला साक्षी होता. सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आणि अंत्यविधिसाठी आलेल्या नागरिकांच्या मोबाईल चा टॉर्च सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. मोरवाडी मधील या स्मशान भूमीत लवकरात लवकर विजेची आणि दिव्यांची सोय करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
यांवर नागरिकांच्या सुख दुःखात फक्त मतमागणी च्या वेळेस सहभागी होणाऱ्या नगरसेवकांनी त्वरित लक्ष द्यावे आणि कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
मोबाईल च्या टॉर्च च्या उजेडात अंत्यविधी करतांना प्रत्येक नागरिकाला आपल्या महानगरपालिकेची लाज वाटल्याशिवाय राहिली नसेल.
👇व्हिडीओ👇
शेवटी स्मशान भूमीत प्रेताला अग्नी दिल्यानंतर झालेला प्रकाश, विजेवर चालणाऱ्या दिव्यांमध्ये कधी बदलणार? हे प्रश्न चिन्ह सगळ्यांना सतावत असेल.



